अमेरिकेतील रिझोना येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार झाला. मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती असून ज्यावेळी कार्यालयात गोळीबार झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यानंतर आता कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत. अमेरिकन नागरिक आपल्या पुढील राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी 5 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करतील. अशातच राजकीय हिंसाचार वाढत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता.