अमेरिकेतील कोलोराडोमध्ये एका व्यक्तीने सुपर मार्केटमध्ये केलेल्या गोळीबारात एका पोलिसासह दहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत गोळीबार करणारा आरोपीही जखमी झाला असून, त्याला अटक करण्यात आले आहे.
कोलोराडोमध्ये असलेल्या एका सुपर मार्केटमध्ये काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सुपर मार्केटमध्ये हा गोळीबार कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याची माहिती अद्याप मिळाली नाही. याबाबत तपास सुरू असून किमान १० जण मृत्यूमुखी पडले असून नक्की आकडा मिळू शकलेला नाही. मृतांमध्ये एक पोलीस अधिकार्याचाही समावेश आहे.