‘अमेझिंग गोवा’ परिषद राज्याच्या आर्थिक विकासास चालना देणार

0
6

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त

राज्यात येत्या नोव्हेंबर 2024 मध्ये होणारी ‘अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस परिषद’ आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, तसेच रोजगार निर्मितीमध्ये आणि प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून गोव्याची प्रतिष्ठा वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला.
अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस परिषदेच्या आयोजनासाठी उद्योग संचालनालय आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पर्वरी येथील मंत्रालयात काल करण्यात आली.

अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस परिषद राज्यातील लघु उद्योग (एमएसएमई) आणि इतर व्यवसायांसाठी संयुक्त उपक्रम, सहयोग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व इतर मान्यवर उपस्थित होते.