अमित शहा पुन्हा एम्स इस्पितळात

0
267

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून शहा यांना आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. सध्या अमित शहा यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अमित शहा यांना २ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती.