ड्रग्स माफिया डेव्हीड द्रिहाम ऊर्फ डुडू याच्यावर ड्रग्स बाळगल्याप्रकरणी पणजी भ्रष्टाचार विरोधी पथकाने न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी काल म्हापसा न्यायालयात साक्षीदार म्हणून त्याच्या पत्नीला उलट तपासणीसाठी बोलाविले असता तिने पोलिस उपनिरीक्षक सुनिल गुडलर पैसे घेतानाची व्हिडीओ शुटींग न्यायालयाला आपण सादर केल्याचे म्हटले आहे.
फेब्रुवारी २०१४मध्ये पोलिस उपनिरीक्षक सुनिल गुडलर यांनी ड्रग्स माफीया डुडू याला हणजूण येथे ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर पणजी येथील भ्रष्टाचार विरोधक पथकाच्या न्यायालयात खटला भरण्यात आला होता. त्यावेळी डुडू यानी न्यायालयाला सांगितले होते की, आपल्या खिशात पोलिस उपनिरीक्षक सुनिल गुडलर यांनी अंमली पदार्थ ठेवून पैसे मागितले होते.
या संदर्भात काल म्हापसा न्यायालयात साक्षीदार डुडूची मैत्रिण झरीना मझरूनोव्हा हिने उलट तपासणीवेळी न्यायालयाला सांगितले की, गुडलर पैसे स्वीकारतानाच स्टींग ऑपरेशन आम्हीच केले आणि त्याची व्हिडीओ न्यायालयासमोर सादर केलेली आहे.