अमली पदार्थ प्रकरणी अर्जुन रामपालची चौकशी

0
287

गेले काही महिने गाजत असलेल्या अमली पदार्थ व्यवहार प्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची काल अमलीपदार्थ विरोधी विभागाने बोलवून घेऊन चौकशी केली. १३ नोव्हेंबर रोजी रामपाल याला अमलीपदार्थविरोधी विभागाने चौकशीसाठी बोलावले होते. त्या दिवशी आपल्या घरी आढळलेल्या पदार्थांसंदर्भात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन त्याने सादर केले होते. मानसोपचारासाठी आपण ती औषधे घेत असल्याचे त्याचे म्हणणे होते. आपला कोणत्याही प्रकारे अमली पदार्थ व्यवहाराशी संबंध नसून आपण तपास यंत्रणेला सहकार्य करीत असल्याचेही त्याने सांगितले होेेते. मात्र, काल त्याला पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. त्याने सादर केलेले प्रिस्क्रिप्शन बनावट असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत बंदी असलेले पदार्थ त्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात आढळले होते.