अमली पदार्थविरोधात विभागाच्या पोलिसांनी काल दुपारी १.३० ते ५.३० या दरम्यान मिरामार येथे एल्विस ओझोवेरो (२८) व जॉन बेन ओकेके (४०) या दोघा नायजेरियन नागरिकांना पकडून त्यांच्याकडून ४,५६२०० रु. किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. त्यांच्याकडे १.११२ किलो एवढा गांजा सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक होंडा ऍक्टिव्हा स्कूटर ताब्यात घेतली आहे. पांढर्या प्लास्टिक पिशव्यात घालून हे अमली पदार्थ आणण्यात आले होते. त्यांना अटक केली असून उपनिरीक्षक दितेंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.