अमली पदार्थप्रकरणी आर्लेकर, आजगावकरांची चौकशी करा

0
2

अन्यथा पोलिसांत जाऊ ः काँग्रेस

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी मंत्री मनोहर आजगावकर यांची कथित अमली पदार्थ प्रकरणात येत्या आठ दिवसात चौकशी करा. अन्यथा, काँग्रेस पक्षाकडून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे, असा इशारा दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिला.

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी मंत्री मनोहर आजगावकर यांनी अमली पदार्थ विषयावरून केलेले आरोप प्रत्यारोप गंभीर स्वरूपाचे आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे, असेही खासदार विरियातो यांनी सांगितले.
राज्यात जून महिन्यात सुमारे 66 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून राज्यात अमली पदार्थाचा विषय गंभीर स्वरूपाचा बनला आहे. युवा पिढीला अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले. यात भाजपचे आमदार, नेते यांचा सहभाग असल्याचा संशयही पणजीकर यांनी व्यक्त केला.
अमली पदार्थ प्रकरणी आरोप प्रत्यारोप करणाऱ्या आमदार आर्लेकर आणि माजी मंत्री आजगावकर यांची चौकशी करण्याची मागणी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी एका पत्रकार परिषदेत काल केली.