अमलीपदार्थप्रकरणी विदेशी पिता-पुत्रीला अटक

0
11

अमलीपदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) शिवोली येथील हुडो समुद्रकिनार्‍यावर छापा टाकून एका विदेशी नागरिक पिता-पुत्रीला अटक करत आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. तसेच अमलीपदार्थ व रोख रक्कम जप्त केली आहे.

एनसीबी गोवाने रविवारी ही कारवाई केली. त्या पिता-पुत्रीकडून सुमारे ५ लाख रुपयांचे अमलीपदार्थ आणि ४.५ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. विदेशी नागरिक जे. ली आणि अंबिका अशी संशयित पिता-पुत्रीची नावे आहेत. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडून एकूण १०७ एमडीएमए गोळ्या, ४० ग्रॅम उच्च दर्जाचे मेफेड्रोन आणि ५५ ग्रॅम उच्च दर्जाचे चरस जप्त केले. या सर्व अमलीपदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे पाच लाख रुपये आहे.