अमरिंदर सिंग यांचा राजीनामा सोनिया गांधींनी स्वीकारला

0
26

कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला असल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले. सिंग यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यावर ‘षडयंत्र’ रचल्याचा आरोप करत कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता.