पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना ७ पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात कॅप्टन यांनी त्यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवास, त्यांच्या कार्यकाळात मिळवलेले यश आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादाबद्दल तपशीलवार लिहिले आहे. यासोबतच अमरिंदरसिंग यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव पंजाब लोक कॉंग्रेस असे असल्याचे सांगितले आहे.