अमरनाथ यात्रेदरम्यानचा दहशतवादी कट उधळला

0
6

अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित एकाला परफ्यूम आरडी बॉम्बसह अटक करण्यात आले आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एका साथीदाराला शनिवारी, 1 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परफ्यूमच्या बॉटलमधील बॉम्ब सापडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरच्या पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली.

सैन्य दलाने श्रीनगरमधील बटमालू बसस्थानकावरून दहशतवादी संघटनेसंबंधित एका साथीदाराला अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपीकडे चार परफ्यूम आयईडी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. यासिर अहमद इट्टू असे या आरोपीचे नाव असून तो कैमोह येथील गुलशनाबादचा रहिवासी आहे.

दरम्यान, पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सुमारे 8 हजार भाविकांनी बाबा बर्फानी यांचे दर्शन घेतले. 1 जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 7,900 भाविक श्री अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांच्या चरणी लीन झाले. शनिवारी पहाटे बालाटल आणि पहलगाम येथून 5,600 यात्रेकरुंना रवाना करण्यात आले होते. इतर भक्तगण हेलिकॉप्टरद्वारे तेथे पोहोचले होते. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 62 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा यावेळी शनिवारपासून सुरू झाली आहे. यंदाची अमरनाथ यात्रा आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा असल्याचे मानले जात आहे. यासाठी तीन लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.