>> पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी
>> आज काणकोण बंदची हाक
चापोली धरणाजवळ अभिनेत्री पूनम पांडे हिने अश्लील चित्रीकरण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला असून अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण आणि त्यांचे दोन सहकारी तसेच जलस्रोत खात्याच्या अधिकार्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी काल काणकोणवासीयांनी उपजिल्हाधिकार्यांना घेराव घातला.
यावेळी माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोणच्या नगराध्यक्ष नीतू देसाई, नगरसेवक दिवाकर पागी, श्यामसुंदर देसाई, गुरू कोमरपंत, काणकोण भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष नंदीप भगत, सचिव दामोदर च्यारी, भूषण प्रभुगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर, प्रवक्ते प्रशांत नाईक, महिला कॉंग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो, जनार्दन भंडारी, विठू मोरजकर, प्रलय भगत, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, गोंयकार संघटनेचे जॅक फर्नांडिस, विकास भगत, आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, संजू नाईक, सामाजिक कार्यकर्ते शांताजी गावकर उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू आणि मामलेदार विमोद दलाल यांनी सर्व माहिती जाणून घेऊन यात जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांड्ये हिने ६ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत पाळोळेच्या सोबीत सरोवर या तारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र, पोलिसांच्या सांगण्यावरून तिने दोन दिवसांपूर्वी हे हॉटेल सोडले आहे. तसेच तिने सरकारी यंत्रणेला आताशी धरून चापोली धरणाजवळ अश्लील चित्रीकरण केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काणकोणची बदनामी होत आहे.
दरम्यान, नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहून दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, पोलीस निरीक्षक राजू देसाई, दीपक पेडणेकर, तुकाराम चव्हाण यांनी आंदोलनकत्यार्ंचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक परमजित सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, या घटनेचा निषेध म्हणून आज काणकोण बंद ठेवण्यात येणार आहे.
…आत्मदहन करणार
हा व्हिडिओ आपल्या १३ वर्षाच्या मुलीने पाहिला असे सांगून या अश्लील व्हिडिओमुळे काणकोणच्या सांस्कृतिक अस्मितेचा र्हास झाला आहे. खर्या गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर आपण काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करणार, असा इशारा प्रमुख तक्रारदार सम्राट भगत यांनी केला. तर सदर व्हिडिओ आपल्या ३ वर्षाच्या मुलीने पाहिल्याने आपण अस्वस्थ