अभिनेता शाहरूख खान उष्माघातामुळे इस्पितळात

0
12

उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला इस्पितळातन दाखल करण्यात आले आहे. शाहरूख खान याची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामना मंगळवारी 21 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. हा सामना पाहण्यासाठी आणि आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शाहरुख खान तिथे हजर होता. या सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली.