अबकारी घोटाळ्याचा तपास ‘एसीबी’कडे

0
5

राज्य सरकारने अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील घोटाळ्याचे प्रकरण दक्षता खात्याकडे शुक्रवारी सोपवले. या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकामार्फत (एसीबी) चौकशी करण्याचे निर्देशही दक्षता खात्याला दिले आहेत. हे प्रकरण गरज भासल्यास चौकशीसाठी ‘एसीबी’कडे दिले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. अखेर त्याचा तपास एसीबीकडे सोपवले आहे.

मद्य परवाने नूतनीकरण करताना 70-80 मद्य व्यावसायिकांकडून शुल्क स्वीकारून सदर शुल्काचा भरणा अबकारी खात्याच्या बँक खात्यात न करता लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात तिघांना निलंबित केलेले आहे.