मडगाव (क्री. प्र.)
अफताब पटेलने लायन्स क्लब ऑफ फोंडातर्फे ढवळी येथील लोकप्रतिष्ठानमध्ये आयोजित दृष्टिहीन मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. धनंजय गावडे आणि कुलदीप देसाई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त झाले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रज्योत गोसावी, सुजित वेळीप, अक्षय सालेलकर, तविश किनळकर, वरद कन्नुर, तनिश किनळकर, संजना पवार, शंकर हूनुर, हर्ष धारगटकर, साईश गावठणकर, सर्वथा लांबोरे आणि अमिंताज सय्यद यांना अनुक्रमे ४ ते १५वे स्थान मिळाले.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लायन रघुवीर देसाई, लायन सुदेश बोकर, लायन सागर साकोर्डेकर, लायन प्रीथा नाईक, लायन अमोघ नमशिकर, आनंद कुर्टीकर, महेश खेडेकर, लायन पूनम वेरेकर व सौ. सारिका नाईक यांची उपस्थिती होती.