>> उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. हेरात शहरात शनिवारी मध्यरात्री भूकंप झाला. मध्यरात्री 3.36 वाजता वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हेरातपासून 33 किलोमीटर 20 मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
रविवारी पश्चिम अफगाणिस्तानात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपांचे सत्र सुरुच असून यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हेरात शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर स्थानिक वेळेनुसार 3.36 मिनिटांनी भूकंप झाला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात 5.5 तीव्रतेचा आफ्टरशॉक बसला.
1000 हून अधिक मृत्यू
7 ऑक्टोबरला हेरातच्या याच भागात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला आणि आठ शक्तिशाली आफ्टरशॉक्सही बसले. यामुळे घरे कोसळली असून अनेक गावे उद्ध्वस्त झाली. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपामुळे 2500 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. .
उत्तर भारतात भूकंप
दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतात काल रविवारी दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली. या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जमिनीपासून 10 किलोमीटर खोल होते. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते.