अफगाणिस्तानमध्ये विमान कोसळले

0
14

मॉस्कोला जाणारे एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून ते एका भारतीय कंपनीचे असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु नंतर हे विमान भारतीय नसून मोरक्कन असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अफगाणिस्तानातल्या बादाख्शान परिसरात हे विमान क्रॅश झाले. मॉस्कोच्या दिशेने निघालेले हे विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले. प्रथम ते भारतीय असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे विमान भारतीय नसून मोरक्कोचे असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

मॉस्कोच्या दिशेने निघालेल्या प्रवासी विमानाचा अफगाणिस्तानमध्ये अपघात झाला. मॉस्कोकडे निघालेले हे प्रवासी विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले. या दुर्घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अफगाणिस्तानी मीडियाने विमान अपघाताची माहिती दिली.
नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, हवाई रुग्णवाहिका म्हणून काम करणारे हे विमान मॉस्कोला जाण्यापूर्वी गया विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबले होते. मंत्रालयानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर पोस्ट करत सांगितलं आहे की, क्रॅश झालेले विमान हे मोरोक्कोमध्ये नोंदणीकृत विमान आहे. ते भारतीय वाहक विमान नाही.
दरम्यान या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून याबाबत अधिकृत काहाही माहिती देण्यात आली नाही.