अपात्रता याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
40

काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर निवाड्यासाठी सभापतींकडून विलंब केला जात असल्याचा दावा करून चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापतींनी चोडणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन 1 नोव्हेंबरला याचिका फेटाळून लावली होती. आता, चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय किंवा निर्देश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या याचिकेत सभापतींना प्रतिवादी केले आहे.