>> कर्नाटकातील कमलापूर येथे ट्रक-बसमध्ये अपघात
गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटून हैदराबादकडे परतणार्या पर्यटकांच्या एका खासगी बसला काल सकाळी कर्नाटकातील कमलापूर येथे भीषण अपघात झाला. ट्रकला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. या बसमधून २८ पर्यटक प्रवास करत होते, त्यापैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांपैकी सर्वजण हे हैदराबाद येथील आहेत.
हैदराबाद येथील अर्जुन कुमार हे आपले कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांसह आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. राज्यातील पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर काल सकाळी ते हैदराबादकडे निघाले होते. त्यावेळी कमलापूर येथे ट्रक व बस यांच्यात अपघात झाला. त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी आगीत होरपळले. त्यात १० पर्यटकांचा मृत्यू झाला.