गोव्यात तस्करी करण्यात येणारे सुमारे २ हजार २२० किलो गोमांस रामनगर – कर्नाटक पोलिसांनी अनमोड येथे एका कारवाईत काल जप्त केले आहे.
कर्नांटक पोलिसांनी गोमांसाच्या तस्कारी प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यात खानापूरच्या २ आणि अळणावरच्या ३ जणांचा समावेश आहे.
रामनगर पोलिसांना कर्नाटकातून गोव्यात गोमांसाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी अनमोड येथे केलेल्या कारवाईत सुमारे ३ लाख १० हजार रूपये किंमतीचे २ हजार २२० किलो गोमांस जप्त केले असून गोमांसाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन वाहने जप्त केली आहेत. सदर गोमांस गोव्यात आणण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.