राज्यातील खासगी जमिनीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या अर्जांसाठी आणखी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, कालपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील 28 फेब्रुवारी 2014 पूर्वीची खासगी जमिनीतील घरे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घरे नियमित करण्यासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम 180 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर, राज्य सरकारकडून अनेकदा अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. गोवा विधानसभेत अनधिकृत बांधकामे नियमित विधेयक (दुरुस्ती) 2023 संमत करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
स्वतःच्या मालकीच्या खासगी जागेत असलेले अनधिकृत बांधकाम कायदेशीर करण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो.