अनंतनागमध्ये पोलिसांकडून सहा दहशतवाद्यांना अटक

0
199

अनंतनाग पोलिसांनी काल केलेल्या एका मोठ्या कारवाईत सहा दहशतवाद्यांना पकडले आहे. पोलिसांनी प्रथम लष्कर ए मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली व त्या दोघांची चौकशी केल्यानंतर, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्राल येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावेळी शोधमोहीम सुरू असताना झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पथकाला यश आले.