अधिवेशन रणनीतीसाठी विरोधकांची सोमवारी बैठक

0
28

गोवा विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी विरोधी पक्षातील सर्व ७ आमदारांची बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल दिली. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न होत आहे.

विरोधी पक्षातील सर्व आमदार एकसंध राहून राज्य सरकारच्या कारभारावर आवाज उठविण्याची रणनीती या बैठकीत निश्‍चित केली जाणार आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे. दरम्यान, हळदोण्याचे कॉंग्रेसचे आमदार ऍड. कार्लूस फेरेरा यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींनी नव्याने जारी केलेल्या निर्देशांवरून सरकारवर टीका केली. जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास सरकार का घाबरत आहे?, एखादा सरकारी प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून सुरू असल्याची त्याची सुरुवातीपासूनची माहिती आमदारांनी का मागू नये? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.