संसद/विधानसभेत ठरावीक दिवस कामकाज बंधनकारक केले पाहिजे असे मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मडगाव येथे प्रतोद परिषदेच्या निमित्त आले असता, पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.विधानसभेत ४० सदस्य असल्यास ४० दिवस, त्यापेक्षा संख्याबळ असलेल्या विधानसभांना ७० दिवस तर संसदेत १०० दिवस कामकाज चालणे बंधनकारक केले पाहिजे असे ते म्हणाले.
संसद व विधिमंडळात कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांशी करावी. सरकार व विविध पक्षांच्या प्रतोदांमध्ये अनौपचारिक बैठका झाल्यास त्याचीही समन्वय वाढविण्यास मदत होईल, असे जावडेकर म्हणाले.
दरम्यान, सदनात शिस्त व शिष्टाचार बिघडत चालला असल्याबद्दल या परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली, असे जावडेकर म्हणाले.