कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल आता कमी होत जाणार असल्याने सरकारने येत्या २७ जुलै रोजी जे एका दिवसाचे अधिवेशन होणार आहे. त्यावेळी आमदार, मंत्र्यांना पिण्याचे पाणी सोडल्यास अन्य काही देऊ नये. आमदार मंत्र्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवणही देऊ नये. फक्त पाणी, चहा व कॉफी देण्याची सोय करावी, अशी सूचना मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना काल घेतलेल्या ऑनलॉइन पत्रकार परिषदेतून केली.
कोरोनाच्या संकटामुळे सरकारने खर्चात कपात करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो योग्य असल्याचे ते म्हणाले.