मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य विधानसभेत २०२० – २०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेच्या वर्ष २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल बुधवारी सादर केला. या आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्याच्या महसुलात वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या अहवालात महसूल वाढ वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत १५.८० टक्के एवढी असल्याचे म्हटले आहे.