अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून रणनीतीवर चर्चा

0
3

गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंडिया आघाडीच्या सहा आमदारांची संयुक्त बैठक काल पणजीत पार पाडली. या संयुक्त बैठकीत आगामी अधिवेशनात सरकारला विविध विषयांवर घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विविध ज्वलंत मुद्द्यांवरून गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांना सरकारला घेरण्याची संधी मिळणार आहे. आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडल्याचे प्रकरण, त्यात पोलीस महासंचालकांचा सहभाग या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार आहेत.राज्यातील बेरोजगारी, स्मार्ट सिटीतील गैरव्यवहार, कला अकादमीचे नूतनीकरण आदी अनेक प्रश्नावर विरोधकांकडून आवाज उठविला जाऊ शकतो.
इंडिया आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, वेंन्झी व्हिएगश, क्रुझ सिल्वा, ॲड. कार्लुस फेरेरा व एल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती.