अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दहा सरकारी विधेयके सादर

0
7

राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल 10 सरकारी विधेयके सादर करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी ही विधेयके सादर केली. या दहा सरकारी विधेयकांमध्ये गोवा खासगी विद्यापीठ (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा विनियोग विधेयक 2023, गोवा नगरपालिका (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा पंचायत राज (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा जमीन महसूल (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा नगर आणि नियोजन (दुरुस्ती) विधेयक 2023, भारतीय स्टॅम्प (गोवा दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमित (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा बेकायदा बांधकामे नियमित (दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा मूल्यवर्धित कर (दुरुस्ती) विधेयक 2023 यांचा समावेश आहे.