अद्भुत

0
122
  • माधुरी रं. शे. उसगावकर

 

मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी ध्यानाची जोड द्यावी. ब्रह्मांडातील शक्तीबद्दल दृढ विश्‍वास बाळगा. हा विश्‍वास नक्कीच किमया करून दाखवतो.

समर्पण आश्रमातील १९१६तील अनुभूती जी माझ्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन आली. नवरात्राौत्सवात शिरोडा येथील आश्रमाच्या संकुलात राहण्याचा दुर्दम्य योग आला. दैनंदिन कार्यभागास मन उबगले. डोळ्यांचे दुखणे, ताप, अशक्तपणा एक से बढकर एक आजार यांची मी जणू शिकारच होऊन बसले. अशा विकलांग परिस्थितीत माझी मैत्राीण साधिका सौ. आशा व मी दोन दिवस आश्रमात राहिलो.

आश्रमातील प्रसन्न वातावरणात पाऊल पडताच गुलदस्त्यातील फुलाप्रमाणे मन मोहीत झाले. ताजेतवाने वाटले. तिथे जमेल तसे मी गुरुकार्यात मदत करीत होते. मंडपात रांगोळी घालणे, पणत्यांची आरास करणे यात माझा सहभाग होता. रात्राी जेवणं आटोपून भव्य शामियानात नवरात्राौत्सवानिमित्त मनोरंजनात्मक, आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गरबा, दांडिया नत्य चालू झाले.  साधक मंत्रामुग्ध होऊ न गरबा, दांडिया लय-तालावर खेळू लागले. कधी त्यात मी सामील झाले जाणवलंच नाही. एवढी ऊर्जा- शक्ती कशी आली?.. आश्‍चर्य वाटलं.  ती अनुभूतीच अनोखी होती. कितीही गुरुकार्य केलं तरी दमछाक होत नव्हती. कार्य करण्यास मन उत्सुक होतं. मनाची मरगळ कुठल्याकुठे नाहिशी झाली. आक्रसलेल्या शरिरात उत्साह निर्माण झाला.

कार्यक्रम उशिरा संपला. उशिरा झोपूनही पहाटे चार वाजता उठले. झोप अपूर्ण झाली तरी त्याचा त्राास होत नव्हता. जणू आठ तासांची झोप होऊन उठल्यासारखे ताजंतवानं वाटलं. पहाटे उठून स्नान करून मौन ध्यान करणं, तद्नंतर साफसफाई करणं सहज शक्य झालं. तसेच आजीवन साधकांकडून त्यांच्या वेगवेगळ्या अनुभूतींची माहिती मिळाली. अनोळखी साधक फार जुनी ओळख असल्याप्रमाणे वागत होते.

प.पू. स्वामींचे सी.डी.तील प्रवचन ऐकताना चैतन्याने मन भारावून जात होते. कुठूनतरी देशी गुलाबाचा सुगंध दरवळल्याचा भास झाला. डोळे मिटून अधिकाधिक ध्यानमय स्थिती अद्भुत वाटू लागली. दुपारी साडेचारच्या वेळी यज्ञकुंडात हवन चालू झाले. वातावरणात मंत्राोच्चारणाचा उद्घोष ऐकू येत होता. यज्ञकुंडातील आहुतीच्या सामग्रीने वातावरणात पावित्र्य बरसत होतं. सारं वातावरण शुचीर्भूत, मंगलमय जाणव ू लागलं. माझ्या दुखण्याचा जराही त्राास होत नव्हता. सगळं कसं प्रफुल्लित. मनमोहकतेचा फील येऊ लागला होता.  इथून निघूच नये असं आम्हाला वाटत होतं. सगळं वातावरण कसं आनंदी खळाळत्या निर्झरासारखं… पारदर्शक व मंगलमय. माझी जगण्याची उमेद हरवली होती. धन्य त्या दोन दिवसातील आश्रमातील अनुभूती! आश्रम म्हणजे केवळ विसाव्याचे स्थान नव्हे; तर निराशेच्या गर्तेत सापडेलेल्यांना पुनरुज्जीवनाचे उर्जित स्थान आहे.

हं, हे खरं आहे. आज दिवसेंदिवस वेगवेगळे आजार वाढताहेत. उपाययोजनांचे पण शोधप्रतिशोध लागताहेत. सर्वांत खतरनाक ‘डिप्रेशन’च्या मानसिक आजाराने व्यक्ती ग्रासून जाण्याची शक्यता जास्त करून वर्तवली जाते आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्व्हे रिपोर्टनुसार ही जगात ओढवणार्‍या परिस्थितीची वास्तविकता आहे. आपल्या देशात कितीतरी समस्या मानसिक स्वास्थ्यासंबंधी आहेत. या आजारातून बाहेर येण्यासाठी फक्त वैद्यकीय उपचारांचीच मदत होऊ शकेल असं नाही. मन सशक्त झालं पाहिजे. अन्यथा हे आगामी काळातील भयानक, विदारक सत्य आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.  ही परिस्थिती बदलण्याची अतीव आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार माणसाला आव्हाने पेलावी लागतात. तणावमुक्त आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची केंद्रे स्थापित झाली पाहिजेत.

आजचं ताजं ज्वलंत उदाहरण कोरोना व्हायरसचं बघा. युरोपातील बातम्या ऐकताना आज ते देश कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे आपण पाहात आहोत. कोरोना संसर्गाने अत्यधिक बाधित असलेला इटली हा देश हादरून गेला आहे. अवघ्या जगावर कोरोना विषाणूच्या संसर्गाची काळी मत्यूछाया पसरली आहे. आपल्या लोकांना अजून परिस्थितीचे गांभीर्य तेवढे नाही. प्रशासन सतर्क आहे. खबरदारी घेत आहे. आपल्या देशात इटलीसारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून ‘जनता कर्फ्यू’ पाळला. आपण प्रशासनाला पूर्ण सहकार्य देऊन सतर्कतेने वागणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.  जगभर कोरोनाचे थैमान चालू आहे. शक्यतो उंबरठ्याच्या आत राहून धीराने ही झुंज द्यायला हवी. सरकार व आरोग्य खात्याच्या सूचनांचे पालन करण्यात आपले हित आहे. तरच कोरोना संसर्ग परिस्थिती आटोक्यात येईल.

जो तो कोविद-१९ विषाणूपासून बचाव करण्यासाठी नानाविध उपाय करत आहे. व्हाट्सऍप कोरोना मेसेजेस आणि व्हिडिओजने भरत आहे. याचा योग्य तोच अर्थ घ्यावा. नाहीतर  आलं अंगावर, घेतलं शिंगावर… असली परिस्थिती नको व्हायला.

भविष्यात जे आजार पसरतील ते व्हायरसमुळे असतील… या विधानाची प्रचीति येत आहे. या आजारातून सुटका मिळवण्यासाठी दक्षता व स्वच्छता याला पर्याय नाही. तसंच सकारात्मक विचार व प्रार्थना करून आपली मनःस्थिती स्थिर राखणे म्हणजे आत्मबल प्राप्त करणे होय.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतिने माणसं ग्रासलेली आहेत. जेव्हा विश्‍वस्तरावर संकट आले तेव्हा मानवता धर्म जागृत झाला. मंदिरे बंद, चर्च बंद, मस्जिद बंद… हदयात विराजमान असलेल्या ईश्‍वराला पूजले जात आहे. पैशाच्या हव्यासात हरवलेला माणूस मायदेशी परिवारात येऊ लागला. हे ईश्‍वरा! तुजा महिमा अपरंपार.

मनातील चिंतनावरच आपली उर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून यशस्वी उन्नत जीवनासाठी मनाला सकारात्मक विचारांची गरज असते. नकारात्मक विचार माणसाला दुर्बल बनवतात. याउलट सकारात्मक विचार नवा उत्साह निर्माण करतात. हळूहळू एक दिवस हा कोरोना नाहीसा होईल. परंतु जे शिकवून जाईल ते विसरू नये. शाकाहार, स्वच्छता आणि आपली पूर्वापार संस्कृती!

रोज सकाळी उठल्यावर निश्‍चय करा व कृतीत आणा – आज मी फार उत्तम काम केलं. सकारात्मक विचार केल्याने प्रेरणा मिळते. यश हे मनाच्या ताकदीवर अवलंबून असते. म्हणून मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी ध्यानाची जोड द्यावी. ब्रह्मांडातील शक्तीबद्दल दृढ विश्‍वास बाळगा. हा विश्‍वास नक्कीच किमया करून दाखवतो. ‘बुद्धीची क्षमता जिथे संपते तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते’.