अतिरिक्त रिव्ह्यूची शिफारस

0
183

 

स्थानिक पंचांच्या अनुभव कमतरतेमुळे अतिरिक्त रिव्ह्यूची शिफारस आयसीसीच्या क्रिकेट समितीने केल्याचे या समितीचा अध्यक्ष असलेला भारताचा माजी कसोटीपटू अनिल कुंबळे याने काल मंगळवारी सांगितले. कोरोना विषाणूंचा धोका कमी झाल्यानंतर सुरु होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने कडक नियमावली घालून दिली आहे.

देशांतर्गत व आंतरदेशीय प्रवासावरील मर्यादेमुळे स्थानिक पंचांचा अधिकाधिक वापर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पंचगिरीचा दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण होऊन याचा फटका संघांना बसू शकतो. त्यामुळे स्थानिक पंचांचा दर्जा व अननुभवीपणामुळे दोन्ही संघाना नुकसान सोसावे लागू नये यासाठी ही शिफारस करण्यात आली असल्याचे कुंबळेने सांगितले.

आयसीसीच्या एलिट पथकातील पंचांची संख्या फार कमी आहे. नियमानवलीमुळे हे पंच विविध देशांत जाऊन पंचगिरी करू शकणार नाहीत, असेही कुंबळेने सांगितले.