द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र या पक्षाचे प्रमुख एम. करूणानिधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. अण्णादुराई यांचे तामिळ व इंग्रजी या भाषांमधील साहित्य अजोड असून राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे. ते एक महान समाज सुधारकही होते, असे करुणानिधी यांनी पत्रात नमूद केले आहे.