जंतर मंतर येथे दि. १६ ऑगस्टपासून आमरण उपोषणासाठी अण्णा हजारे यांना परवानगी नाकारण्याचेे दिल्ली पोलिसांनी ठरविल्याचे कळते. या मुद्द्यावर काल दिल्ली पोलीस आयुक्त व केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची चर्चा झाली. दरम्यान, जंतर मंतर ऐवजी त्यांनी दिल्लीच्या उपनगरी भागात बुरारी किंवा अजमल खान पार्कमध्ये पर्यायी जागा सुचविण्यात आली आहे.
उपोषणाच्या काळात संसदीय अधिवेशन असेल व जंतर मंतर परिसर हा गर्दी सामावून घेण्यासाठी फारच लहान आहे, अशी कारणे पुढे करण्यात आली आहेत.
मंत्रिमंडळाने प्रभावहीन लोकपाल विधेयक संमत करण्याची तयारी चालविल्याचा आरोप करून अण्णांनी दि. १६ ऑगस्टपासून उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे.