माशेल (न. वा.)
भोम वरचावाडा येथे काल दुपारी २ वाजता अचानक पाऊस वारा नसताना भलामोठा वृक्ष झाडाच्या खाली पार्क केलेल्या जीए ०५ टी २२४८ या मासळी वाहतूक करणारे ज्ञानेश्वर नाईक यांच्या बॉलेरोगाडीवर तसेच डिओ जीए ०५ सी ४३६७ स्कूटरवर कोसळला. बॉलेरो गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून डिओ स्कुटरचेही नुकसान झाले. बॉलेरो गाडीचे अंदाजे ५ लाख रुपये एवढे नुकसान झाल्याचे बॉलेरोचे मालक ज्ञानेश्वर नाईक यांनी सांगितले.
याप्रकरणी सरपंचांनी कुंडई अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दलाचे सुभाष नाईक आपल्या आठ कर्मचार्यांना घेऊन घटनास्थळी आले. त्याचप्रमाणे माशेल विद्युत कार्यालयातील कर्मचारीही तिथे येऊन कनेक्शन तोडले. तीन विद्युत खांब कोसळल्याने तिथे विद्युत वाहिन्या रस्त्यावर पडल्या होत्या. दलाच्या जवानांनी लगेच गाडी वर पडलेले झाड कापण्यास सुरवात केली. संध्याकाळी उशिरापर्यंत ते काम करीत होते.