अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारताची सलामी अर्जेंटिनाशी

0
217

येत्या ३ ते १० मार्चपर्यंत मलेशियात सुरू होणार्‍या २७व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारताची सलामीची लढत अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. भारत आपला सलामीचा सामना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी अर्जेंटिनाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ४ मार्ज रोजी इंग्लंडविरुद्ध, ६ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि ९ मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे.

हॉकी विश्वचषकात भारत ‘क’ गटात
दरम्यान, २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या हॉकी विश्वचषकासाठी भारताचा ‘क’ गटात समावेश झाला आहे. भारतासाठी हा सोपा गट असल्याचे दिसते. केवळ बेल्जियम हा एकमेव बलाढ्य संघ या गटात आहे. १६ डिसेंबररोजी हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेत भारत आपला सलामीचा सामना २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर २ डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध तर ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध खेळणार आहे.
गटवारी ः ‘अ’ गट अर्जेंटीना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स, ‘ब’ गट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन, ‘क’ गट बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका,‘ड’ गट नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान.