हिवरे बुद्रक सत्तरी येथे जितेंद्र प्रभाकर गांवकर (२८) याने रानात नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह काल सायंकाळी झाडाला लोंबकळताना आढळून आला. तो दि. १५ पासून बेपत्ता होता. बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी वाळपई पोलीस स्थानकात करण्यात आली होती. गेली दोन वर्षे तो म्हापसा अग्निशामक दलात कामाला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. गावात तो स्वभावाने अगदी शांत म्हणून परिचित होता. तसेच त्याने हल्लीच नवीन घर बांधले होते. त्याच्या पश्चात आईवडील व लहान भाऊ आहे.