अग्निशामक दलातील ३०३ पदे भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गृहखात्याचे अवर सचिव प्रीतिदास गावकर यांनी त्यासाठी अधिसूचना काढली आहे. ह्या सुचनेनुसार दलात अ श्रेणीतील दोन पदे, ब श्रेणीतील तीन तर २९८ पदे ही क श्रेणीतील आहेत. यात विभागीय अधिकार्यांची दोन पदे, साहाय्यक विभागीय अधिकार्यांची तीन पदे आहेत.
तर क श्रेणीत फायर ऑफिसर एक पद, उपअधिकारी बारा पदे, लिडिंग फायर फायटर ३३ पदे, चालक ऑपरेटर ४२ पदे, वॉचरूम ऑपरेटर ९ पदे, फायर फायटर १८५ पदे, वरिष्ठ स्टेनोग्राफर एक पद, अव्वल कारकून एक पद, कनिष्ठ कारकून १४ पदे मिळून एकूण ३०३ पदे भरण्यात येणार आहेत.