अखेर पोलीस संरक्षणात ‘ते’ तियात्र सादर

0
107
गोमंत विद्या निकेतन नाट्यगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त व प्रेक्षकांची तपासणी करताना पोलीस. पोलीस स्थानकावर मोर्चा नेताना तियात्रप्रेमी.(छाया : गणादीप शेल्डेकर)

तौसिफ दि नावेलीम या युवकाने लिहिलेल्या ‘आकांतवादी गोयांत नाकात’ या तियात्राच प्रयोग व्हावा यासाठी काल लोकांनी पोलिसांवर दबाव आणून संरक्षण देण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात मडगावच्या गोमंत विद्या निकेतन नाट्यगृहात तियात्र सादर झाले. प्रयोग झाल्यास त्याला व घरच्यांना ठार करण्याचे धमकीचे फोन आल्याने तौसिफने तियात्राचा खेळ रद्द केला होता. श्रीराम सेनेनेही तियात्रास विरोध प्रकट केला होता.
काल दुपारी ३ वा. दरम्यान तियात्र प्रेमींनी तौसिफला सोबत घेऊन पोलीस स्थानकावर मोर्चा नेला व तियात्राच्या खेळाला संरक्षणाची मागणी केली. प्रयोग होऊ नये यासाठी धमक्या दिल्या जात असल्याची कल्पना पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी तात्काळ पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली. सुमारे ७० पोलीस नाट्यगृहाबाहेर तैनात करण्यात आले होते. शिवाय बॉम्ब शोधक पथकाने दोनदा सभागृह तपासले. प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची तपासणीही पोलिसांनी केली.
शेवटी संध्याकाळी ५ वा. तियात्राचा प्रयोग सादर झाला. तियात्र उशीरा सादर झाले तरी पाहायचे आहे, अशी प्रेक्षकांची भूमिका होती. सासष्टीतले लोक कुणाच्या धमकीला भीत नाहीत, हे दाखवून द्यायचे असल्याचे एका तियात्र प्रेमीने सांगितले. प्रेक्षकांत महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. क्रांतीच्या विचारांनी मन जागे झाले