अखेर ‘ते’ विमान दाबोळीला उतरले

0
13

अझुर एअर कंपनीचे ङ्गतेफ विमान शेवटी शनिवारी रात्रौ दाबोळी विमानतळावर उतरले. हे विमान शनिवारी सकाळी 4.55 वा. दाबोळी विमानतळावर उतरणार होते. मात्र, सदर विमानात बाँब ठेवण्यात आला असल्याचा ईमेल आल्यानंतर ते विमान भारतीय हवाई हद्दीत पोचण्यापूर्वीच उझबेकिस्ताकडे वळवण्यात आले
होते.
उझबेकिस्तान येथे ते उतरविण्यात आल्यानंतर त्या विमानाची तपासणी करण्यात आली असता त्यात बाँब नसल्याचे आढळून आले. त्यानंतर या विमानाने गोव्याकडे येण्यासाठी उड्डाण केेले आणि शनिवारी रात्री हे विमान दाबोळी विमानतळावर
उतरले.
शनिवारी मध्यरात्री दाबोळी विमानतळावर उतरलेल्या या विमानात 240 प्रवासी होते. त्यात दोन छोटी मुले व विमान कंपनीचे 7 प्रवासी होते. गेल्या 12 दिवसांच्या काळात रशियातून गोव्याच्या वाटेकडे असताना बाँबच्या अफवेमुळे परत नेण्यात आलेले हे दुसरे विमान होते.