अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडून होणार

0
4

बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले होते. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबारात तो ठार झाला होता. या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी सोपवण्यात आला आहे.

सीआयडीसोबतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे. सीआयडी अधीक्षक नवी मुंबई हे तपास पथकाचे प्रमुख असतील.
काल अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला असून, तशा आशयाची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी करण्यात येणार आहे.