अंमलीपदार्थप्रकरणी इस्रायली युवकाला अटक

0
95

अमली पदार्थविरोधी पोलिसानी गुरुवारी रात्रौ हरमल किनार्‍यावरील रेस्टॉरंटजवळ एका इस्रायली युवकाला अटक करून त्याच्याकडून एल्‌एस्‌डी हे द्रव रूपातील अमली पदार्थ जप्त केले. १०.३ ग्राम एवढे हे अमली पदार्थ असून त्याची किमत २० लाख ६० हजार रू. एवढी आहे. आरोपीकडून एक मोबाईल व १२०० रू. रोख जप्त करण्यात आले. त्याला तीन दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे.