अंत्यसंस्कार आज संध्याकाळी ५ वाजता

0
265

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल देशात केंद्र सरकारतर्फे सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान आज शुक्रवारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर संध्या. ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वाजपेयी यांचे पार्थिव आज सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दु १ या वेळेत त्यांचे पार्थिव येथील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.