फोंडा तालुका चेस असोसिएशनतर्फे गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या डिस्ट्रिक्ट ३१७बी लायन्स क्लब इंटरनॅशनल गोवा राज्य अंडर-१९ बुद्धिबळ स्पर्धेस काल मंगेषी येथील वागळे हायस्कूलच्या सभागृहात प्रारंभ झाला.
स्पर्धेत खुल्या गटात ८३ व मुलींच्या गटात ५३ मिळून एकूण १३६ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. पार्थ कामत, शुभ कळंगुटकर, स्कंधज कोठा, प्रत्नेश मालवणकर, प्रतीक मालवणकर, आदित्य तारी, वेदांत आंगले, गिरिजा पेडणेकर, सय्यद मैझाह, सय्यद महदिया यांनी पहिल्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांरवर मात करीत पूर्ण गुण मिळविले.