हेलिकॉप्टर कोसळून तिघा जणांचा मृत्यू

0
8

धुक्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात काल सकाळी 7.30 च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. त्यात तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सफर्ड क्लब येथील हेलिपॅडवरून ह्या हेलिकॉप्टरने टेकऑफ केले होते. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळले. ते हेलिकॉप्टर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मार्गस्थ झाले होते. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला.