हरयाणाचे गृहमंत्री वीज यांचा बंडाचा पवित्रा

0
6

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ज्येष्ठ मंत्री अनिल वीज यांच्याकडून गृहखाते काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्री वीज यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत असून बंडाचा पवित्रा घेतला आहे. माझ्याकडून केवळ गृहखातेच का मागता? मी माझ्याकडील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व संशोधन.

आयुष तसेच तंत्रशिक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञान ही खातेही सोडायला तयार आहोत, मला मंत्रिपदाची हौस नाही. केवळ आमदार म्हणूनही मी काम करू शकतो, असे त्यांनी जाहीर केले आहे. माझ्याकडील गृह खाते काढून घेण्यासाठी दोन वर्षांपासून पद्धतशीर मोहीम सुरू असल्याचा आरोपही यावेळी मंत्री वीज यांनी केला आहे.