स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर 1800 विशेष अतिथींना निमंत्रण

0
23

उद्या होणाऱ्या 77 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आले आहे.