स्टार वॉर्समध्ये भारताने केला प्रवेश

0
3

हवेतल्या हवेत नष्ट होणार ड्रोन, क्षेपणास्त्रे

भारत बनला जगातील केवळ चौथा देश

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) संरक्षण क्षेत्रात क्रातीकारी पाऊल टाकत एक शस्त्र विकसित केले आहे. या अस्राने शत्रूची विमाने क्षेपणास्रे, ड्रोन हवेतल्या हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढणार आहे. या प्रकारचे तंत्रज्ञान मिळविणारा भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा केवळ चौथा देश ठरला आहे. या नव्या शस्राची चाचणी डीआरडीओने घेतली आहे. भारतीय डीआरडीओच्या या नव्या 30 किलोवॅट क्षमतेच्या लेसर-आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून स्थिर-विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आणि ग्रुप ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येणार आहेत, त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
या आधी लेझरने विमान पाडण्याचा प्रयोग अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केला आहे. इस्रायलदेखील अशाच प्रकल्पावर काम करीत आहे.

भारत चौथ्या क्रमांकांचा देश
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) हे लेझर आधारित शस्त्र विकसित केले आहे, जे आता लष्करातील वापरासाठी उत्पादित आणि तैनातीसाठी सज्ज होणार आहे. या डीआरडीओच्या या कामगिरीने भारत अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्र तयार केले आहे. ही तर प्रवासाची सुरुवात आहे. आपण लवकरच आपले ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालींवर देखील काम करीत आहोत. आम्ही अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करीत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टार वॉर्स क्षमता मिळेल. अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी ही क्षमता दाखवली आहे. इस्रायल देखील अशाच क्षमतांवर काम करीत आहे. असे म्हटले आहे.

चाचणीतील वैशिष्ट्‌‍ये
या प्रणालीचे कुरनूल (आंध्र प्रदेश) येथे वाहनावरून प्रात्यक्षिक यशस्वी झाले. स्थिर पंखांच्या ड्रोनला नेमके लक्ष्य करत अचूक हल्ला करण्यात आला. ड्रोनची झुंड नष्ट करत त्यांचे सेन्सर्स व अँटेना निष्क्रिय करण्यात आला. प्रकाशाच्या वेगाने हल्ला करण्यात आला व काही सेकंदांत लक्ष्यभेद करण्यात आले. यातून यंत्रणेची अचूकता, गती आणि परिणामकारकता अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. लक्ष्यावर वीजेसारखा वेग, अचूकता आणि काही सेकंदांत होणारी हानी या प्रणालीला सर्वात प्रभावी अँटी-ड्रोन शस्त्र बनवते. ही प्रणाली लक्ष्य ओळखून, प्रकाशाच्या वेगाने लक्ष्यांवर वार करते.

काय आहे ही प्रणाली..?
30 किलोवॅट क्षमतेची ही लेसर शस्र प्रणाली 5 किलोमीटरच्या परिसरात ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केली आहे. या प्रणालीत अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहेत, ज्यामध्ये संप्रेषण आणि उपग्रह सिग्नल जॅम करण्याची देखील ताकद आहे. अचूक लक्ष्य वेध करण्यासाठी ही प्रणाली 360-डिग्री इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड सेन्सरने सुसज्ज आहे आणि ती हवाई, रेल्वे, रस्ते किंवा समुद्राद्वारे वेगाने कुठेही नेऊन तैनात केली जाऊ शकते. ड्रन युद्धाचा वाढता धोका आणि त्यावर कमी खर्चात व परवडणाऱ्या प्रत्युत्तराच्या दिशेने भारताने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आधुनिक युद्धांमध्ये ड्रोनचा सढळहस्ते व मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रशिया-युक्रेन युद्धातही ड्रोनचा वापर आहे. त्यामुळे ही प्रणाली आवश्यक होती.