बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 2 ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही भागात पावसाची शक्यता येथील हवामान विभागाने काल व्यक्त केली. दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. राजधानी पणजीतील किमान तापमान 2.2 अंशांनी कमी झाले आहे. पणजीत चोवीस तासांत किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे, तर कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. ग्रामीण भागातील किमान आणि कमाल तापमानातही घट झाली आहे.