सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी आज सीबीआय गोव्यात

0
7

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सीबीआयचे पथक आज गोव्यात येणार आहे. गोवा सरकारने सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. सोनाली फोगट यांच्या मृत्यूच्या सुरुवातीपासूनच त्यांचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी करत होते. यासाठी त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन लेखी अर्ज दिला होता. त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पत्र लिहिले होते.
दोन दिवसांपूर्वी सोनाली फोगाट यांची बहीण रुकेश यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना आपल्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमागे राजकीय कारण असल्याचा संशयही व्यक्त केला होता.