सुट्टीवर आलेल्या जवानाची सशस्त्र गुन्हेगारांकडून हत्या

0
9

मणिपूरची राजधानी इंफाळमधील पूर्व जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात काल रविवारी 17 रोजी सुट्टीवर आलेल्या एका लष्करी जवानाची हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तीन सशस्त्र गुन्हेगारांनी जवानाचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. सदर हत्या झालेला जवान हा सेना दलात कार्यरत असून तो सध्या सुट्टीवर गावी आलेला होता.